Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या संदीप सिंह गिल्ल पुणे ग्रामीणच्या अधीक्षकपदी

राज्यातील सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
संदीप सिंह गिल्ल पुणे ग्रामीणच्या अधीक्षकपदी



मुंबई ः खरा पंचनामा

राज्यातील सहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने बदल्यांचे हे आदेश काढण्यात आले आहेत. मिरजेचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांची पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे ग्रामीणचे अधीक्षक पंकज देशमुख यांची मुंबईच्या पोलिस उपायुक्तपदी तर मुंबईच्या उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची पुणे शहरच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. मुंबई झोन ९ चे उपायुक्त राजतिलक रोशन यांची मुंबईतील कायदा व सुव्यवस्थाच्या सहायक पोलिस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. नागपूर शहरचे उपायुक्त निमित गोयल यांची मुंबईच्या उपायुक्तपदी बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. भंडाऱ्याचे पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांची नागपूर शहरच्या उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. सोलापूर राज्य राखीव बल १० चे समादेशक विजय चव्हाण यांची सोलापूर पीटीसीच्या प्राचार्यपदी बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.