Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजितदादांच्या मंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता

अजितदादांच्या मंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी
शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता



मुंबई : खरा पंचनामा

राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली आहे.

वळसे पाटील पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. एकीकडे मंत्रिमंडळ बैठकीला दांडी तर दुसरीकडे वळसे पाटील हे शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील आता हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वळसे पाटील यांनी तुतारी हाती घेतल्यास हा अजित पवार आणि राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असणार आहे.

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत आले. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र आत पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटील हे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली आहे, तसेच ते पुण्यात शरद पवार यांची देखील भेट घेणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान यापूर्वी देखील शरद पवार यांनी अजित पवार यांना अनेक धक्के दिले आहेत. आता वळसे पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.