Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

केवळ एका कारसाठी केला निवृत्त लष्करी सुभेदाराचा खून उस्मानाबाद येथून संशयिताला अटक, सांगली एलसीबीची कारवाई

केवळ एका कारसाठी केला निवृत्त लष्करी सुभेदाराचा खून
उस्मानाबाद येथून संशयिताला अटक, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

तासगाव तालुक्यातील बलगवडे येथील डोलीर् फाटा येथील निवृत्त लष्करी सुभेदाराच्या खूनप्रकरणी एकाला उस्मानाबाद जिल्ह्यातील देवगाव येथून अटक करण्यात आली. सुभेदारांकडे असलेली मारूती कार विकून त्याचे पैसे हडप करण्यासाठी हा खून केल्याची कबुली संशयिताने दिल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.

वैष्णव विठ्ठल पाटील (वय १९, रा. बलगवडे, ता. तासगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गुरुवारी सकाळी लष्करातील निवृत्त सुभेदार गणपती धोंडीराम शिंदे (वय ६५) यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तासगाव पोलिसांसह एलसीबीचे निरीक्षक शिंदे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. शिंदे यांच्या घराच्या परिसरात चौकशी केल्यानंतर संशयिताचे नाव निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी विविध ठिकाणी पोलिस पथके पाठवण्यात आली होती. खबऱ्यांकडून मिळालेली माहिती तांत्रिक तपासाद्वारे संशयित पाटील उस्मानाबाद जिल्ह्यात असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर पथकाने उस्मानाबाद जिल्ह्यातील मौजे देवगाव येथे जाऊन वैष्णव पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने शिंदे यांची मारूती कार विकून त्याचे पैसे हडप करण्यासाठी शिंदे यांचा खून केल्याची कबुली दिली. तसेच जाताना शिंदे यांच्या खिशातील दीड हजार रूपयेही नेल्याची कबुली दिली. त्याला अटक करून तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, रूपाली बोबडे, अरूण पाटील, सतीश माने, प्रकाश पाटील, संदीप नलवडे, अभिजित ठाणेकर, रोहन गस्ते, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.