फटाक्यातील उरलेली दारू उडविताना आगीचा भडका; चार मुले गंभीर जखमी
गणेशवाडीतील घटना
शिरोळ : खरा पंचनामा
गणेशवाडी (ता. शिरोळ) येथे उडालेल्या फटाक्यातील उरलेली दारू एकत्र करून पेटविल्याने आगीचा भडका उडाला. या भडक्यात चार लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. यातील तिघांना सांगली सिव्हिल येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अफान राजेशखन्ना पानारी, प्रीतम सदाशिव बेळके, माझ इब्राहिम जमादार, वेदांश भुशींगे अशी जखमी मुलांची नावे आहेत. गावात चार दिवसांपूर्वी फटाक्यांच्या आतषबाजीत गणेशविसर्जन करण्यात आले. त्या फटाक्यांचा उर्वरित कचरा, कागदिपुट्टा अद्याप रस्त्यावर, चौकात पडलेले आहेत.
वार्ड क्रमांक १ मधील चौघा मुलानी उडविलेल्या फटाक्यांची दारू एकत्र केली. नंतर ती पेटवली. त्यावेळी आगिचा मोठा भडका उडाला. त्यात त्या चौघांचे चेहरा, हात, पाय भाजले आहेत. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे नागरिक, नातेवाईक घटनास्थळी आले. मुलांवर तातडीने प्राथमिक उपचार करून सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारास पाठवून दिले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.