Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अमित शहांनी महायुतीच्या नेत्यांना दिला राजकीय चित्र बदलण्याचा फॉर्म्युला

अमित शहांनी महायुतीच्या नेत्यांना दिला राजकीय चित्र बदलण्याचा फॉर्म्युला



मुंबई : खरा पंचनामा

गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यंदाच्या वर्षा अखेरीस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. या निवडणुकीसाठी भाजपनं आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या प्रायोगिक आणि जन सर्वेक्षणानुसार, यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला 123 तर महाविकास आघाडीला 152 जागा मिळू शकतात. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी (8 सप्टेंबर 2024) रात्री उशिरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेतली.

या बैठकीत विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध शासकीय योजनांबाबत जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ शकतात, असं मानलं जात आहे. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं नुकत्याच केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरही चर्चा झाली. या बैठकीत अमित शहा यांनी भाजप नेत्यांना वादग्रस्त वक्तव्य करणं टाळण्यासोबतच, वाद टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, आपण महायुतीत आहोत, त्यामुळे आपल्यातील प्रत्येकानंच संयम बाळगला पाहिजे आणि एकात्मतेची प्रतिमा जनतेसमोर येईल याची काळजी घेतली पाहिजे. तसेच, विधानसभेच्या उमेदवारीसाठी विजयी क्षमता असलेल्या योग्य उमेदवारांची निवड करण्याचाही सल्ला दिला. त्याचप्रमाणे विरोधकांच्या फेक नरेटिव्हला प्रत्युत्तर देत राहा, असंदेखील अमित शाह यांनी सांगितलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.