Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवार यांचे बारामतीमधून निवडणूक न लढवण्याचे स्पष्ट संकेत

अजित पवार यांचे बारामतीमधून निवडणूक न लढवण्याचे स्पष्ट संकेत



बारामती : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचा पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला होता. हा पराभव अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना रविवारी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.

आता बारामतीकरांना मी नाही तर दुसरा आमदार मिळाला पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले. यामुळे अजित पवार आता बारामती विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

अजित पवार म्हणाले, आपण लाखोंच्या मतांनी निवडून येणारी माणसे आहोत. मी आता ६५ वर्षांचा झालो आहे. मी समाधानी आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. 'एकच दादा अजित दादांचा' घोषणा दिल्या. अजित पवार त्यांना थांबवत पुन्हा म्हणाले, जेथे पिकते तेथे विकत नाही. एकदा बारामतीकरांना मी सोडून इतर आमदार मिळाला पाहिजे. मग तुम्ही त्याच्या कारकिर्दीतील आणि माझ्या कारकिर्दीची तुलना करा.

बारामतीकरांना न सांगता सर्व मिळत गेले. न सांगता रस्ते होत गेले. न सांगता पिण्याच्या पाण्याची योजना आली. मेडीकल कॉलेज न मागता मिळले. आयुर्वेदीक कॉलेज मिळाले. सध्या बारामती शहर सोडून इतर मतदार संघात ७५०कोटींची कामे चालू आहेत.

रोखठोक बोलणारा म्हणून माझी ओळख आहे. बारामती शहर असो गावं असतील आपण विकास करत आहोत. विकास कामांना प्राधान्य कसं देता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. विकास करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. काही महत्त्वाचे निर्णय घेताना आपण लोकांचं मत घेतो. शेवटी निर्णय मीच घेतो. पण मतं जाणून घेतलं तर निर्णय घेताना फायदा होतो असेही पवार यावेळी म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.