Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शासकीय दूध डेअरीत चोरी करणारी टोळी अटकेत मुद्देमाल जप्त, मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई

शासकीय दूध डेअरीत चोरी करणारी टोळी अटकेत
मुद्देमाल जप्त, मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई



मिरज : खरा पंचनामा

शहरातील शासकीय दूध डेअरी फोडून त्यातील साहित्य लंपास करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सिलिकोन स्टीलच्या ३८२ किलोच्या पट्ट्या जप्त करण्यात आल्या आहेत. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. 

गणेश रामू बजंत्री, संतोष दत्तात्रय झळके (दोघेही रा. रॉकेल डेपो झोपडपट्टी, मिरज), आमीन मोहम्मद खान (रा. गुरुवार पेठ, मिरज), वैभव राजू कनशेट्टी (रा. मंगळवार पेठ, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. फेब्रुवारी महिन्यात मिरजेतील शासकीय दूध डेअरी फोडून त्यातील साहित्य अज्ञातांनी लंपास केल्याची तक्रार राहुल लकडे यांनी दिली होती. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील चोरट्यांना पकडण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक प्रयत्नशील होते. 

पथकाला या चोरीमध्ये गणेश बजंत्री याचा सहभाग असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने दूध डेअरीतील ट्रान्सफॉर्मरमधील पट्ट्या चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून त्यांच्याकडून ३८१ किलो वजनाच्या पट्ट्या जप्त करण्यात आल्या. 

मिरजेचे पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, महात्मा गांधी चौकचे सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण, विक्रम खोत, अभिजित धनगर, विनोद चव्हाण, जावेद शेख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.