महाविद्यालयात घुसून बारावीच्या विद्यार्थ्याची हत्या
बारामती : खरा पंचनामा
बारामतीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या परिसरामध्ये 12 वी शिकत असणा-या विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सोमवारी (दि.30) च्या सुमारास ही घटना घडली आहे. अथर्व पोळ असे हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात मृत तरुण आणि आरोपी एकाच वर्गात शिकत होते. आज या दोघांमध्ये काही कारणांवरुन वाद झाला. हा वाद इतका वाढला की एकाने दुस-यावर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात अथर्व पोळ याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले.
हा खून कोणत्या कारणातून करण्यात आला याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. मात्र, या विद्यार्थ्यांचा खून महाविद्यालयाच्या परिसरात झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे परिसरात मृतदेह पाहून अनेकांचा थरकाप उडाला. यासंदर्भात पोलीसांनी संबंधित युवकांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.