Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नियमांचा भंग करत EVM रथाला अजित पवारांनी दाखवला झेंडा? जिल्हाधिकाऱ्यांनी खेड तहसीलदारांकडे मागवला खुलासा

नियमांचा भंग करत EVM रथाला अजित पवारांनी दाखवला झेंडा? 
जिल्हाधिकाऱ्यांनी खेड तहसीलदारांकडे मागवला खुलासा



पुणे : खरा पंचनामा

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील नेते, पक्ष जय्यत तयारी करत असल्याचं चित्र आहे, अशातच काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ईव्हीएम रथाला झेंडा दाखवून नियमांचा भंग केल्याचं बोललं जात आहे, याप्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांनी खेड तहसीलदारांकडे खुलासा मागवला आहे.

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत (ईव्हीएम) जनजागृती आणि प्रात्यक्षिक, जनजागृती फिरत्या रथाचा शुभारंभ खेड तहसील येथे करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या कक्षेतील हा कार्यक्रम इतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निमंत्रित न करता मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आल्याने तालुका निवडणूक अधिकाऱ्यांकडून आचारसंहिता भंगाचा पश्न निर्माण झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडुन निवडणुक आयोगाच्या नियमांचा भंग झालाय का? नियम डावलुन निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम प्रचार रथाचे अजित पवारांनी उद्घाटन केले का?, याचा खुलासा मागवला आहे. पुण्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदार संघातील गुरुवारच्या दौऱ्यातील ही घटना आहे. खेड- आळंदी विधानसभा मतदार संघात इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन अर्थात, ईव्हीएम विषयी जनजागृती करण्यासाठी हा प्रचार रथ तयार करण्यात आला होता.

या रथाचे उद्घाटन तहसीलदार ज्योती देवरे यांनी अजित पवार यांच्या हस्ते या रथाचा शुभारंभ करून घेतल्याचं बोललं जातं आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी तहलसीदार ज्योती देवरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाचे कार्यक्रम कसे घ्यावेत, याचे नियम निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार, निवडणूक आयोगाचे कार्यक्रम मंत्री, लोकप्रतिनिधी किंवा ठराविक राजकीय पक्षाच्या प्रमुख किंवा प्रतिनिधींच्या उपस्थितीत घेऊ नयेत असा नियम आहे. मात्र, निवडणूक आयोगाचे सर्व नियम धाब्यावर बसवून खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मतदान यंत्र हाताळणी व प्रशिक्षण कार्यक्रम जनजागृती रथाचे उदघाटन केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.