सुप्रीम कोर्टाचं अधिकृत YouTube चॅनेल हॅक; अमेरिकन कंपनीच्या व्हिडिओचे प्रमोशन
नवी दिल्ली : खरा पंचनामा
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत You Tube चॅनेल हॅक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्या या चॅनलवर अमेरिकी कंपनी रिपल लॅब्सद्वारा विकसित क्रिप्टोकरेंसी XRP ला चालना देणारे व्हिडिओ दाखवले जात आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत यु-ट्युब चॅलनवरून महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी प्रसारित केली जाते. पण सध्या हे चॅलन हॅक करण्यात आले असून, चॅनलवर यापूर्वीचे कोणतेच जुने व्हिडिओ दिसत नसून, अमेरिकन कंपनी असलेल्या Ripple Labs ने विकसित केलेल्या क्रिप्टोकरन्सीबद्दची माहिती देणारे व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत. अलीकडेच, कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात आली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.