मोबाईल हिसकावून घेतल्याच्या रागातून 10 वर्षांच्या मुलाचा आईवर बॅटने हल्ला
मुंबई : खरा पंचनामा
एका 10 वर्षाच्या मुलाने आईवर क्रिकेटच्या बॅटने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने मुलाच्या हातामधून मोबाईल हिसकावून घेतल्याच्या रागातून मुलाने आईच्या डोक्यावर बॅटने हल्ला केला. ही घटना घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
त्यामधे दिसते की, मुलगा फोन पाहण्यामध्ये व्यस्त आहे. इतक्यात त्याची आई तिथे येते व ती मुलाला फोनच्या वापरावरून रागे भरते. ती त्याच्या हातामधील फोन काढून घेते व त्याला अभ्यासाला बसायला सांगते.
मुलगा निमुटपणे सर्व काही ऐकतो. त्यानंतर थोड्यावेळाने तो आत जातो व नंतर शेजारी ठेवलेल्या बॅटने आईवर हल्ला करतो. आई बेशुद्ध पडते व मुलगा परत फोनवर खेळू लागतो. अहवालानुसार, घटनेनंतर काही वेळाने घरातील इतर सदस्यांनी महिलेला पाहिले आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
सध्या महिलेची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या मुलाचे वय केवळ 10 वर्षे असल्याने, ही घटना अधिकच चिंताजनक आहे. मोबाइल आणि डिजिटल उपकरणांच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर काय घातक परिणाम होऊ शकतात, हे या घटनेने अधोरेखित केले आहे. दुसरीकडे, अनेकांनी याला स्क्रिप्टेड व्हिडिओ देखील म्हटले आहे. एका यूजरने लिहिले की, 'हे स्क्रिप्टेड आहे, परंतु यातील संदेश खूप काही शिकवणारा आहे.'
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.