Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आचारसंहिता लागू झाल्यापासून 15 ते 24 ऑक्टोबरपर्यंत राज्यात 90 कोटी 74 लाखांची मालमत्ता जप्त

आचारसंहिता लागू झाल्यापासून 15 ते 24 ऑक्टोबरपर्यंत राज्यात 90 कोटी 74 लाखांची मालमत्ता जप्त



मुंबई : खरा पंचनामा

राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 (Assembly General Election) साठी 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू , ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत 15 ते 24 ऑक्टोबरपर्यंत एकूण 90 कोटी 74 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून, त्यापैकी गेल्या 24 तासात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

निवडणूक आचारसंहितेच्या काळात सजगपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील 19 अंमलबजावणी यंत्रणांनी एका दिवसात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याची कामगिरी बजावली आहे. विविध ठिकाणी पोलिस विभाग आणि इतर यंत्रणांनी उभारलेले तपासणी नाके योग्य पध्दतीने कार्यरत असल्यामुळे हे यश मिळाले आहे. 1) इन्कमटॅक्स डिपार्टमेंन्ट 30 कोटी 93 लाख 92 हजार 5732) रेव्हयून्यू इन्टेलिजन्स - 8 कोटी 30 लाख 84 हजार 8783) राज्य पोलीस डिपार्टमेंट 8 कोटी 10 लाख 12 हजार 8114) नार्कोटिस्ट कंन्ट्रोल ब्युरो 2 कोटी 50 लाख5) राज्य उत्पादन शुल्क विभाग 1 कोटी 75 लाख 3926) कस्टम डिपार्टमेंट 72 लाख 65 हजार 745 दिवसभरात झालेल्या कारवाईमध्ये नागपूर, मुंबई उपनगर, रत्नागिरी ह्या जिल्ह्यांमधल्या मोठ्या कारवायांचा समावेश आहे. इथून निवडणूक यंत्रणा दक्ष असून मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा संदेश गेला आहे. प्रत्येक प्रकरणाच्या मागील धागेदोरे तपास काढून गुन्ह्याची साखळी मोडून काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.