विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई शहरातील 15 पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडून संबंधित पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपासून इतर सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसांत काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. तर शुक्रवारी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मुंबई शहरात कार्यरत असलेल्या 15 पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या नव्याने नियुक्त झालेल्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यालय दोनचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांची परिमंडळ 6, कलिना सशस्त्र विभागाचे पोलीस उपायुक्त नितीन पवार यांची पोलीस मुख्यालय 2, अंमलबजावणी विभागाच्या पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांची परिमंडळ 4, परिमंडळ दहाचे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष कृती दल, परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांची विशेष शाखा 1, पोलीस मुख्यालय एकचे पोलीस उपायुक्त महेश चिमटे यांची संरक्षण विभाग, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांची पोलीस मुख्यालय 1, विशेष शाखा एकचे पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांची परिमंडळ 3, परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची गुन्हे शाखा अंमलबजावणी, पूर्व उपपगरे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांची पूर्व उपनगरे वाहतूक विभाग, संरक्षण विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकांत मंगेश सागर यांची परिमंडळ 7, सुरक्षा विभागाच्या पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांची सुरक्षा विभाग, नागपूरचे पोलीस उपायुक्त निमित्त गोयल यांची कलिना येथील सशस्त्र पोलीस विभाग, ठाण्याचे पोलीस उपायुक्त सुधाकर बी. पाठारे आणि सचिन गुंजाळ यांची अनुक्रमे बंदर परिमंडळ विभाग व परिमंडळ दहाचे पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) महासंचालकपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजीव सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली. सिंघल अप्पर पोलीस महासंचालक होते. तसेच राज्य पोलीस मुख्यालयातील आस्थापना विभागाचाही पदभार त्यांच्याकडे होता. सिंघल यांच्याप्रमाणेच अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी यांनाही महामंडळात व्यवस्थापकीय संचालकपदी (महासंचालक) पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.