5 कोटींच्या खंडणीसाठी पुण्यातील पुजाऱ्यासह सात शिष्यांचं अपहरण
महाराष्ट्र पोलिसांची कर्नाटकात सिने स्टाईल कारवाई
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. पाच कोटींच्या खंडणीसाठी पुण्यातील एका पुजाऱ्यासह सात शिष्यांचं अपहरण करण्यात आलं. मात्र त्यानंतर पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन सिने स्टाईल कारवाई केली. पुजाऱ्यासह त्यांच्या शिष्यांची किडनॅपरच्या ताब्यातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. आरोपींना अटक देखील करण्यात आलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजरंग लांडे नावाचे पुण्यात एक पुजारी आहेत. २९ जुलै रोजी सायंकाळी बजरंग यांचा मुलगा स्वप्निल याला आरोपीने घरी येऊन विजापूर येथे एकाच्या घराची पुजा करायची आहे तसेच मुर्तीची प्रण प्रतिष्ठा करायची आहे असं सांगितलं. त्यासाठी तुम्ही कर्नाटकला या असं अरोपी म्हणाला. त्यानंतर लांडे आणि त्यांचे सात शिष्य कर्नाटक येथे गेले. मात्र तिथे त्यांना घरात पूजा अथवा मुर्ती प्राणप्रतिष्ठेची कोणतीही तयारी दिसली नाही.
याच वेळी पुण्यात भेटलेल्या आरोपींनी लांडे यांना त्यांच्या शिष्यासह एका खोलीत डांबून ठेवलं आणि फोनवरून त्यांच्या कुटुंबाला संपर्क करत ५ कोटींच्या खंडणीची मागणी केली.
या घटनेची तात्काळ दखल घेत बिबवेवाडी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणद्वारे कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधत त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. पुणे पोलिसांनी थेट रायचूर गाठत आरोपींच्या ताब्यातून पुजाऱ्याची आणि त्यांच्या शिष्यांची सुटका केली. रामु वळुन, दत्ता करे आणि हर्षद पाटील असे अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावं आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.