Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आदिवासी उमेदवारांना पोलीस भरतीत 5 सेंमी उंचीची सूट

आदिवासी उमेदवारांना पोलीस भरतीत 5 सेंमी उंचीची सूट



मुंबई : खरा पंचनामा

राज्य सरकारने पोलीस भरतीत आदिवासी उमेदवारांना 5 सेंमी उंचीची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात अनुसूचित जमातीसाठीच्या या विशेष तरतुदीमुळे पोलीस भरतीची स्वप्न पाहणाऱ्या आदिवासी तरुण-तरुणींना याचा मोठा लाभ होणार आहे. राज्य सरकारकडून आदिवासी उमेदवारांना पाच सेंटिमीटरची सूट देण्याबाबत नुकतेच राजपत्र प्रसिद्ध केले आहे.

राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांना शारीरिक पात्रतेमधील विहित केलेल्या उंचीमध्ये 5 सेंटिमीटरची शिथिलता देण्यात यावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने भारतीय पोलीस सेवा, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स व अन्य सेवेत शारीरिक क्षमता चाचणीमध्ये आदिवासींना 5 सेंमीची सूट आहे; पण राज्यात ही सूट नव्हती. आता या निर्णयामुळे आदिवासी उमेदवारांना खूप मोठा लाभ होणार आहे. 

महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 चा 22) याच्या कलम 5 च्या खंड (ब) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थन करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2011 यात आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या नियमास महाराष्ट्र पोलिस शिपाई सेवाप्रवेश (सुधारणा) नियम, 2024 संबोधले जाणार आहे. जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात, अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये 5 सेंटिमीटर इतकी शिथिलता यापुढे पोलीस भरतीत देण्यात येणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.