Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

डिलिव्हरी बॉयकडून हप्ता घेणं पडलं महागात 5 पोलीस तडकाफडकी निलंबित

डिलिव्हरी बॉयकडून हप्ता घेणं पडलं महागात
5 पोलीस तडकाफडकी निलंबित



नवी मुंबई : खरा पंचनामा

गॅस सिलेंडरची घरपोच पुरवठा करणाऱ्या गाडीवरील चालकाची गाडी अडवून त्याला दमदाटी दिली. इतकेच नाही तर च्याकडून ३ हजार रुपये उकळले. दरम्यान हे पैसे घेणे पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले असून या कारणावरून नवी मुंबई पोलीस दलातील ५ पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

नवी मुंबई पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी एस्कॉर्ट वाहन ऐरोली येथे व्हिआयपीला घेण्यासाठी जात असताना उरण फाटा येथे गॅस सिलेंडरच्या डिलीव्हरीसाठी जात असलेल्या विक्रम खोत या टेम्पो चालकाला अडविले. त्यांनी गाडी व्यवस्थित चालवत नसून गाडीचे पेपर अपूर्ण असल्याचे सांगत २० ते २५ हजार रुपये दंड भरावा लागेल अशी भिती दाखवली. यावेळी विक्रम खोतकडून ३ हजार रुपये घेऊन हे पोलीस कर्मचारी पसार झाले. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गॅस सिलींडरची डिलीव्हरी करणाऱ्या टेम्पो चालकाला दमदाटी करुन त्याच्याकडुन ३ हजार रुपये उकळणे नवी मुंबई पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले. स्वप्नील देवरे, विशाल दखणे आणि सचिन बोरकर अशी या तीन पोलिसांची नावे असून सदर प्रकरणात या तिघांवर नेरुळ पोलीस ठाण्यात खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या तिघांसोबत एस्कॉर्टच्या वाहनामध्ये असलेल्या इतर दोन पोलिसांचा या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग दिसून आला नसला, तरी त्यांना देखील या प्रकरणात निलंबीत करण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.