Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दसऱ्यानिमित्त 'म्हाडा'कडून पुणे, पिंपरीसह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगलीतील 6 हजार 194 सदनिकांची सोडत

दसऱ्यानिमित्त 'म्हाडा'कडून पुणे, पिंपरीसह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगलीतील 6 हजार 194 सदनिकांची सोडत



पुणे : खरा पंचनामा

दसऱ्यानिमित्त 'म्हाडा'च्या पुणे विभागाने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह पीएमआरडीए हद्द, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सहा हजार २९४ सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. या सोडतीसाठी नागरिकांना गुरुवारी (ता. १०) दुपारपासून म्हाडाच्या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.

म्हाडा गृहनिर्माण योजनेत 'प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य'मध्ये दोन हजार ३४०, म्हाडाच्या विविध योजनांतील उपलब्ध सदनिका ९३, प्रधानमंत्री आवास योजनेत 'प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य'मध्ये ४१८ सदनिका सोडतीसाठी उपलब्ध आहेत तर २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत तीन हजार ३१२ सदनिका, तर १५ टक्के सामाजिक गृहयोजनेतील १३१ सदनिकांसाठी सोडत होणार आहे,

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.