Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात 7 दिवस असणार ड्राय डे!

विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यात 7 दिवस असणार ड्राय डे!



मुंबई : खरा पंचनामा

मुख्य निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होतील तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच कोणत्या दिवशी ड्राय डे असेल हेदेखील स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रात 1 नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त, 12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीनिमित्त तर 15 नोव्हेंबरल गुरू नानक जयंती निमित्त ड्राय डे आहे. तर 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावतील, तेव्हापासून ते 20 नोव्हेंबरला मतदान पार पडेपर्यंत राज्यातील दारूची दुकानं बंद राहतील. 23 नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल असल्यामुळे त्यादिवशीदेखील ड्राय डे असणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.