Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मनसे नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढणार?

मनसे नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढणार?



मुंबई : खरा पंचनामा

विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष करत आहेत. लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणार असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं होतं. मात्र आता विधानसभेसाठी मनसे स्वबळावर लढणार आहे. विधानसभा निवडणुकीत 220 ते 240 जागा लढणार असल्याचं राज ठाकरे यांनी घोषित केलं आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी दौरा सुरू केला आहे. राज ठाकरे यांनी नुकताच विदर्भाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत मतदारसंघाचा आढावा घेतला.

मनसेनं नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्याची तयारी सुरू केलीय. राज ठाकरेंनी नागपूरमधील सर्व 6 विधानभा जागांवर लढण्याची तयारी करा असे आदेश दिल्याचं स्थानिक मनसे त्यांनी सांगितलंय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार देणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं समजतंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात वंचित पाठोपाठ मनसेही उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. तुषार गिरे हे या मतदारसंघातून मनसेतर्फे निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे.

मनसेच्या देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याच्या शक्यतेवर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते आणि नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी प्रत्येक राजकीय पक्षाला उमेदवार देण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. मनसेने अगोदरच निर्णय घेतला आहे महाराष्ट्रात 225 उमेदवार देतील, त्यामुळे उमेदवार देतील हे अपेक्षित होतं असं संदीप जोशी यांनी म्हटलं आहे. मला कोणीतरी म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न होतो आहे का? पण प्रयास हमेशा शेर को घेरने का ही होता है, देवेंद्र फडणवीस शेर आहेत. 50 हजारपेक्षा जास्त मतांच्या फरकाने ते निवडणूक येतील असंही संदीप जोशी यांनी म्हटलंय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.