Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दिल्लीतील मुख्यमंत्री आतीशी यांचे निवासस्थान सील

दिल्लीतील मुख्यमंत्री आतीशी यांचे निवासस्थान सील



दिल्ली : खरा पंचनामा

दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाबत नवा वाद समोर आला आहे. आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाचा ताबा आणि हस्तांतरावरून वाद निर्माण झाला आहे. कारवाई करत पीडब्ल्यूडीने मुख्यमंत्र्यांचे दिल्लीतील निवासस्थान सील केले आहे. निवासस्थानाबाहेर दुहेरी कुलूप लावण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील करण्याबाबत सीएमओकडून निवेदन समोर आले आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रिकामे करण्यात आल्याची माहिती सीएमओकडून देण्यात आली आहे.

सीएमओच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, भाजपच्या सांगण्यावरून एलजीने सीएम आतिशी यांचे सामान सीएम निवासस्थानातून जबरदस्तीने हटवले आहे. भाजपच्या एका बड्या नेत्याला सीएम निवासस्थान देण्याची एलजीच्या वतीने तयारी सुरू आहे. 27 वर्षांपासून दिल्लीतून बाहेर असणाऱ्या भाजपला आता मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान काबीज करायचे आहे.

4 ऑक्टोबर रोजी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ल्युटियन झोनमधील त्यांच्या नवीन पत्त्यावर जाण्यासाठी त्यांचे जुने निवासस्थान सोडले होते. अद्याप त्यांना राहण्यासाठी जागा मिळाली नाही. राष्ट्रीय पक्षाच्या प्रमुख या त्याने त्यांनी राहण्यासाठी जागा मिळण्याची मागणी केंद्र सरकार ला केली होती मात्र त्यावर केंद्र सरकार कडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. असा आरोप त्यांनी केला. केजरीवाल कुटुंबासह पक्षाचे सदस्य अशोक मित्तल यांच्या 5, फिरोजशाह रोड, मंडी हाऊसजवळील अधिकृत निवासस्थानी आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.