Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बाबा सिद्दीकींना संपवण्यासाठी २५ दिवसांचं प्लॅनिंग, पार्सलद्वारे पिस्तूल अन् अॅडव्हान्स पेमेंट आरोपींची चौकशीत खळबळजनक माहिती !

बाबा सिद्दीकींना संपवण्यासाठी २५ दिवसांचं प्लॅनिंग, पार्सलद्वारे पिस्तूल अन् अॅडव्हान्स पेमेंट
आरोपींची चौकशीत खळबळजनक माहिती !



मुंबई : खरा पंचनामा

सिद्दीकींच्या हत्येसाठी आरोपींना अॅडव्हान्स पेमेंट करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितलं की, शस्त्र विक्रेत्याने कुरियरद्वारे पिस्तूल सोपवलं होतं. हे पिस्तूल हल्ल्यादरम्यान वापरलं गेलं. या हल्ल्यासाठी बिश्नोई गँगचा कर्नेल सिंग हा या प्रकरणात महत्त्वपूर्ण भूमिकेत होता. कर्नेल सिंगला २०१९ मध्ये हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती, आणि जेलमध्ये असताना त्याने बिश्नोई गँगसोबत संपर्क साधला होता.

कर्नेल सिंग आणि त्याच्या गँगने अनेक दिवसांपासून सिद्दीकी यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते. सिद्दीकी यांची रेकी करून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या सगळ्या कटात लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचं पुढे आलं आहे. आरोपींनी यासंबंधी चौकशीत सगळं उघड केलं आहे की, हे संपूर्ण काम अत्यंत योजनाबद्धरीत्या करण्यात आलं होतं.

२ सप्टेंबरपासून हे आरोपी कुर्त्यात भाड्याने खोली घेऊन रहात होते. या खोलीसाठी महिन्याला १४ हजार भाडं देत होते. ४ जणांनी मिळून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची सुपारी घेतली होती. प्रत्येकी ५० हजार वाटून घेणार होते. पंजाबमध्ये हे तिघं जणं एका जेलमध्ये असताना एकमेकांच्या संपर्कात आले. जेलमध्ये आधीपासून बिष्णोई गँगचा एक सदस्य होता त्याच्या संपर्कात हे तिघं आले होते.

बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे संध्याकाळी ८:३० वाजता दफन केले जाणार आहे. मुस्लिम समाजाच्या परंपरेनुसार त्यांचा दफनविधी पार पडणार आहे. यापूर्वी त्यांचे पार्थिव बांद्यातील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, जिथे बॉलिवूडमधील नामवंत सेलिब्रिटी तसेच राजकीय नेते येण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.