Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आता उमेदवाराच्या प्रचारासाठी लागणाऱ्या खर्चावर बसणार आळा; आयोगाचे निर्देश

आता उमेदवाराच्या प्रचारासाठी लागणाऱ्या खर्चावर बसणार आळा; आयोगाचे निर्देश



मुंबई : खरा पंचनामा

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 15 ऑक्टोबरला राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्यातील 288 जागांवर एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे.

तसेच 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. तसेच या निवडणुकांच्या वेळेस उमेदवारांने किती आणि काय खर्च करावा, यावर आता आळा बसणार आहे. कारण निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणूक लढविताना उमेदवाराने प्रचारासाठी किती खर्च करावा, या मर्यादा घालून दिल्या आहेत.

विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी आता उमेदवाराला किती आणि काय खर्च करावा, यावर आता निवडणूक आयोगाची पाळत असणार आहे. कारण निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणूक लढविताना उमेदवाराने प्रचारासाठी किती खर्च करावा, यासाठी मर्यादा घालण्यात आल्या आहेत. प्रत्येक उमेदवाराला फक्त 40 लाख रुपये खर्च करण्याचे निर्देश आयोगाने जारी केले आहेत. आयोगाने त्यासंदर्भात आता दरपत्रक काढले असून त्यामध्ये चहा, नाष्टा, जेवण, गाडी खर्चासोबत व्हीआयपीसाठी देण्यात येणाऱ्या बुके याचा देखील समावेश आहे. तसेच यासंदर्भात आयोगाने काटेकोरपणे नियोजनदेखील आखून दिले आहे. तसेच या आदर्श दरपत्रकानुसार खर्च करून त्याचा हिशेब आता प्रत्येक उमेदवाराला आयोगाला सादर करावा लागणार आहे.

निवडणूक आयोगाने राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी एकूण किती खर्च करावा, ही मर्यादा दिली आहे. त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला आपल्या प्रचारासाठी 40 लाख रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला 40 लाखांपेक्षा जास्त पैसे वापरून प्रचार करता येणार नाही. तसेच या खर्चाचा अहवाल त्यांना निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या 288 इतकी आहे. एसटी प्रवर्गासाठी 25 जागा राखीव आहेत. एससी प्रवर्गासाठी 29 जागा राखीव आहेत. तर, 234 जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना 2009 मध्ये झाली होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.