"राजकारण्यांना जाळ्या नसलेल्या इमारतीवरुन उड्या मारायला लावल्या पाहिजेत"
पुणे : खरा पंचनामा
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थीत सध्या प्रचंड खालावली आहे. राजकारण्यांची भाषा प्रचंड खालच्या पातळीवर पोहोचली आहे. सध्या महाराष्ट्रात काय वाट्टेल ते सुरु आहे. काही नेते मंडळी तर जाळ्यांवर उड्या मारत आहेत.
खरंतर महाराष्ट्रात असे अनेक राजकारणी आहेत त्यांना जाळ्या नसलेल्या इमारतीवरुन उड्या मारायला लावल्या पाहिजे, अशा घणाघाती शब्दांत मनसे प्रमुख राज ठकारे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावर आज पुण्यातील साहित्य परिषदेच्या कार्यालयात झालं. यावेळी राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, या समेमलानाच्या बोधचन्हाच्या निवडीसाठी, देशभरातून आलेली अनेक बोधचिन्ह माझ्याकडं पाठवण्यात आली होती. त्यातील राजमुद्रा आणि लेखणीचा अंतर्भाव असलेले बोधचिन्ह मला आवडलं आणि ते निवडावं असं सुचवलं. साहित्य संमेलन समितीने देखील ते स्वीकारलं.
ते म्हणाले, "महाराष्ट्राची साहित्याची परंपरा उज्वल आहे. साहित्य संमेलन भरवणारे देखील महाराष्ट्र हे एकमेव राज्य असावं. खरंतर अशा कार्यक्रमात काय किंवा साहित्य संमेलनात काय राजकारण्यांना बोलवायची गरज नाही. साहित्यिकांनी बोलावं आणि राजकारण्यांनी ऐकावं असंच असलं पाहिजे. सध्या महाराष्ट्राची एकूणच परिस्थिती प्रचंड खालावली आहे, राजकारण्यांची भाषा तर प्रचंड खालच्या पातळीवर गेली आहे, अशा राजकारण्यांना साहित्यिकांनी चांगलच ठणकावलं पाहिजे. महाराष्ट्रात सध्या वाट्टेल ते सुरु आहे. नेते जाळ्यांवर उड्या काय मारत आहेत, खरंतर महाराष्ट्रात असे अनेक राजकारणी आहेत ज्यांना जाळ्या नसलेल्या इमारतीवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत", असेही ठाकरे म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.