निवडणूक लढवणं हा मूलभूत अधिकार नाही
उच्च न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज
मुंबई : खरा पंचनामा
फलटण कोरेगाव विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या एका उमेदवाराला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. निवडणूक लढवणे हा मूलभूत अधिकार नाही, असे स्पष्ट करत दिगंबर आगवणे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दिगंबर आगवणे हे भाजपचे पदाधिकारी होते. त्यांनी २०१९ सालची निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवली होती. दिगंबर आगवणे हे भाजपचे पदाधिकारी होते. त्यांनी २०१९ सालची निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवली होती.
दिगंबर आगवणे यांना ११ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. याशिवाय त्यांच्यावर स्थानिक पोलिस ठाण्यात आणखी गुन्हे दाखल आहेत. विविध कर्ज प्रकरणे, पतसंस्थांची फसवणूक, जमीन घोटाळे, खंडणी, धमकी अशा विविध आरोपांखाली ते सध्या तुरुगात शिक्षा भोगत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आगवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी व प्रचारासाठी तात्पुरता जामीन मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
त्या याचिकेवर न्या. मनीष पितळे यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. ईडीच्या वतीने ज्येष्ठ वकील संदेश पाटील यांनी युक्तिवाद केला. त्यांनी खंडपीठाला सांगितले की, आगवणे यांच्याविरोधात १२ एफआयआर दाखल आहेत, त्यामुळे त्यांना जामीन देण्यात येऊ नये, न्यायालयाने याची दखल घेत आगवणे यांना दिलासा देण्यास नकार दिला व जामीन देण्याची त्यांची मागणी फेटाळून लावली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.