Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिसांसाठी ३ नवीन रुग्णालयांत वैद्यकीय तपासणीची सुविधा राज्य सरकारचा निर्णय

पोलिसांसाठी ३ नवीन रुग्णालयांत वैद्यकीय तपासणीची सुविधा
राज्य सरकारचा निर्णय



मुंबई : खरा पंचनामा

सणासुदीचे दिवस असो वा आपत्कालीन परिस्थिती असो पोलीस २४ तास ऑन ड्युटी असतात. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना आरोग्य तपासणीत अडचण येऊ नये यासाठी तीन नवीन रुग्णालय उपलब्ध करण्यात आली आहेत. नाशिक, वाशी व मुंबईत अंधेरी पूर्व येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

वय वर्षे ४० ते ५० या वयोगटातील गृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षांतून एकदा व वय वर्षे ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी बंधनकारक आहे. वैद्यकीय तपासणीसाठी ५ हजार रुपये या प्रमाणे खर्चाची प्रतिपूर्ती गृह विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत 'अपवादात्मक बाब' म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून करण्यात येते. गृह विभागातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मुंबई व कोकण विभागासाठी तीन नवीन रुग्णालयांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या ३ रुग्णालयांत होणार वैद्यकीय तपासणी : अपोलो क्लिनिक, वाशी, अपोलो क्लिनिक, अंधेरी (पूर्व), अपोलो क्लिनिक, नाशिक.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.