Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवारांच्या जवळच्या व्यक्तीवर ईडीची मोठी कारवाई

अजित पवारांच्या जवळच्या व्यक्तीवर ईडीची मोठी कारवाई



पुणे : खरा पंचनामा

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून जोरदार तयारी सुरू झाली आहे. असे असताना पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांची ८५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे आता मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, मंगलदास बांदल यांची पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. बेकायदा आर्थिक व्यवहार (मनी लॉड्रिंग) प्रकरणी मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडीतील निवासस्थानी ईडीने २१ ऑगस्ट रोजी छापे टाकले होते. त्यावेळी बांदल यांना अटक करण्यात आली होती. तसेच ईडीने बांदल यांच्या निवासस्थानातून कागदपत्रे जप्त केली आहेत. याबरोबरच त्यांच्या बँक खात्यांची माहितीही ईडीच्या अधिका-यांनी घेतली आहे. बांदल हे अजित पवारांच्या जवळचे मानले जातात.

लोकसभा निवडणुकीत बांदल यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला होता. मंगलदास बांदल यांच्याविरुद्ध पुणे पोलीसांनी एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याबरोबरच बांदल यांच्याविरुद्ध शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

यामुळे ते अडचणीत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते ईडीच्या रडारवर आहेत. आता ईडीने त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. दरम्यान मंगलदास बांदल यांच्यावरील कारवाईने शिरुर- हवेलीत राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

दरम्यान, मनी लॉड्रिंग प्रकरणी मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडीतील निवासस्थानी ईडीने २१ ऑगस्ट रोजी छापे टाकले होते. त्यांना अटकही करण्यात आली होती. याबाबत आता विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.