'महाराष्ट्र केसरी' अभिजित कटके याच्या घरी आयकर विभागाची छापेमारी!
पुणे : खरा पंचनामा
महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी अभिजित कटके यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. वाघोलीतील अभिजीत कटके यांच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी केली असून अभिजीत कटके पुण्यातील भाजप नगरसेवक अमोल बालवडकर यांचे मेहुणे आहेत.
हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी अभिजित चंद्रकांत कटके व वाघोली परिसरातील १५ जमीन विकसकांच्या घरी व कार्यालयावर आयकर विभागाने आज पहाटेच धाड टाकली. धाड टाकल्याची बातमी सकाळी सर्वत्र पसरली. आयकर विभागाची की ईडीची धाड याबाबत चर्चा सुरू होती. प्रथम कटके यांच्याच घरी धाड टाकल्याची चर्चा होती. नंतर वाघोली व परिसरातील गावातील १५ जमीन विकसकांच्या घरी व कार्यालयात धाड टाकल्याचे समोर आले.
वाघोली, आहाळवाडी फुलगाव, वढू बुद्रुक, अष्टापूर आदी ठिकाणी राहणारे हे जमीन विकसक आहेत. पहाटे पाच वाजताच हे धाड सत्र सुरू झाले. या सर्वांच्या कार्यालयात व घरावर आयकर विभागाने धाड टाकली. दुपारपर्यंत हे धाड सत्र सुरू होते. अभिजित कटके हे माजी नगरसेवक व कोथरूड विधान सभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार अमोल बालवडकर यांचे मेहुणे आहेत. कोणाकडे किती मालमत्ता मिळते याचीच चर्चा परिसरात सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.