Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुण्यात मध्यरात्री पोलिसांचा गोळीबार, २ जण जखमी

पुण्यात मध्यरात्री पोलिसांचा गोळीबार, २ जण जखमी



पुणे : खरा पंचनामा

पोलिस बीट मार्शलवर हल्ला करून पसार झालेल्या चंदन चोरट्याला पोलिसांनी अटक केली. त्यावेळी झटापटीत पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन चोरटे जखमी झाल्याचे तपासात समोर आले आहे.

आसिफ हरुनखान गोलवाल (वय २४, रा. जंजाळ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शाहरुख कादीरखान पठाण, फारुखखान कादीरखान पठाण (रा. जंजाळ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) हे दोघेजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पसार झालेल्या नदीमखान लतीफ खान, फिरोजखान शरीफ खान आणि नजीमखान सादुखान या चोरट्यांचा शोध घेत आहेत.

डेक्कन परिसरात २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पोलिस बीट मार्शल महेश तांबे आणि गणेश सातव विधी महाविद्यालय रस्ता परिसरात गस्तीवर होते. एरंडवणा परिसरातील जानकी व्हिला बंगल्याजवळ आरोपी आसिफ गोलवाल आणि त्याचे साथीदार अंधारात थांबले होते. ते बंगल्याच्या आवारातून चंदनाचे झाड कापून नेण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी संशयावरून त्यांना हटकले. तेव्हा चोरट्यांच्या इतर साथीदारांशी पोलिसांची झटापट झाली. चोरट्यांनी बीट मार्शल तांबे आणि सातव यांच्यावर करवतीने वार केला. त्यावेळी तांबे यांनी स्वसंरक्षणार्थ चोरट्यांच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला. परंतु चोरटे अंधारात पसार झाले.

तपासादरम्यान, पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणात चोरटे छत्रपती संभाजीनगर परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शोध घेत पोलिसांनी जंजाळ गावातून आरोपी गोलवालला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे दोन साथीदार गोळीबारात जखमी झाल्याची माहिती मिळाली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.