Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"मी तुम्हाला मत दिले, आता माझे लग्न लावून द्या" मतदाराची आमदाराकडे अजब मागणी

"मी तुम्हाला मत दिले, आता माझे लग्न लावून द्या"
मतदाराची आमदाराकडे अजब मागणी



महोबा (उत्तर प्रदेश) : खरा पंचनामा

उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील चरखारी विधानसभेचे आमदार बृजभूषण राजपूत यांच्यासोबत एक विचित्र घटना घडली आहे. कारण बृजभूषण यांच्याकडे एका मतदाराने अशी मागणी केली की त्या मागणीमुळे आमदार आश्चर्यचकीत होऊन काही वेळ त्या व्यक्तीकडे पाहात बसले.

परंतु, त्यानंतर त्यांनी त्यांच्या समस्येवर मार्ग काढण्याचे आश्वासन देत नक्कीच मदत करू असे सांगितले. आमदार बृजभूषण राजपूत आणि या व्यक्तीमधील संभाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यूपीच्या महोबा जिल्ह्यातील चरखारी विधानसभेचे आमदार बृजभूषण राजपूत हे एका ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका व्यक्तीने त्यांच्याकडे धाव घेतली. त्यामुळे आमदार बृजभूषण यांना वाटले की त्या व्यक्तीला कोणती तरी समस्या असेल ज्याची तक्रार करण्यासाठी त्यांनी धाव घेतली असेल. परंतु, या कर्मचाऱ्याने त्याचे लग्न न झाल्याची व्यथा आमदारासमोर मांडली. तर मी तुम्हाला मत दिले असून मी तुमचा मतदार आहे, ज्यामुळे आता तुम्ही माझे लग्न लावून द्या, अशी थेट मागणीच या कर्मचाऱ्याने केली. त्याची ही मागणी ऐकून आमदारांनाही नेमके काय उत्तर द्यावे, हे कळाले नाही. ज्यामुळे काही क्षणासाठी ते एकदम शांत बसले.

यानंतर आमदार बृजभूषण राजपूत यांनी या कर्मचाऱ्याची व्यथा ऐकून सुरुवातीला त्याच्या कुटुंबियांबाबतची विचारपूस केली. तसेच, आपण या प्रश्नावर मार्ग काढून एखादी मुलगी शोधू, असे आश्वासन दिले. आमदार बृजभूषण आणि पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या या संभाषणाचा एका व्यक्तीने व्हिडीओ बनवला असून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. या व्हिडीओच्या शेवटी आमदार बृजभूषण आणि पेट्रोल कर्मचारी एकमेकांना हात मिळविताना दिसून येत आहेत. त्यामुळे आता आमदार बृजभूषण त्यांच्या मतदाराला कशाप्रकारे मदत करणार? मतदाराला दिलेले आश्वासन पूर्ण करणार का? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.