"गणपती-नवरात्र उत्सवाचा चोथा झाला"
सांगली : खरा पंचनामा
गणपती आणि नवरात्र उत्सव सध्या इव्हेंट्समध्ये बदलले असून, हिंदू समाजाची दिशा बिघडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गणपती उत्सवाचा चोथा झाला असून, नवरात्र उत्सवात होणाऱ्या दांडियामुळे हिंदू समाजाला गोंधळात टाकले जात आहे," असे विधान श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले.
"नवरात्राचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही," असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर काही माता-भगिनींनी स्वतंत्र दुर्गामाता दौड काढावी, असे ते म्हणाले. "नवरात्र उत्सवात करमणुकीचे कार्यक्रम सध्या सुरू आहेत, जे उत्सवाची शुद्धता आणि परंपरा नाश करत आहेत."
"शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप बनण्याचा मार्ग शिकवला, पण आज गणपती आणि नवरात्र उत्सवात आम्ही समाजाला गोंधळात टाकतोय," असे ते म्हणाले. "हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदी चिनी भाई भाई यांसारखी विचारसरणी समाजाला दिशाहीन करत आहे," अशी त्यांनी टीका केली. याचबरोबर त्यांनी पंतप्रधानांवरही निशाणा साधला, "हिंदी चिनी भाई भाई म्हणणारा पंतप्रधान हे आपल्यासाठी दुर्दैव आहे," असे भिडे म्हणाले.
"हे सर्व शूद्र आहेत, हे भुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत," असे त्यांनी सांगितले. त्याऐवजी शिवाजी महाराजांच्या विचारांचा अंगीकार करून समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाजी महाराजांच्या विचारांचा सन्मान राखून समाजाने प्रगती करावी, अशी त्यांनी सूचना केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.