निवडणुकीच्या कामासाठी मुंबईबाहेर जावेच लागेल, पोलिसांना दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार
मुंबई : खरा पंचनामा
निवडणुकीच्या कामासाठी मुंबईबाहेर ड्युटी करण्यास नकार देणाऱ्या २१ पोलिस अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलासा देण्यास नकार दिला. सुटीकालीन न्यायालयाचे न्या. संदीप मारणे व न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने पोलिस अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी मुंबईबाहेर जावेच लागेल, असे स्पष्ट करत मॅटच्या निर्णयाला स्थगिती दिली.
निवडणुकीच्या कामाला मुंबईबाहेर पोस्टिंग नको, यासाठी २१ पोलिस निरीक्षकांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. मॅटने त्यांना दिलासा देत बदली आदेशाला स्थगिती दिली होती. या निर्णयाला पोलिस महासंचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.
त्यावर आज (ता. ३०) सुटीकालीन न्यायालयाचे न्या. संदीप मारणे व न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. राज्य सरकारच्या वतीने युक्तिवाद करताना खंडपीठाला सांगण्यात आले की, निवडणूक कर्तव्यासाठी पोलिस कर्मचारी आवश्यक आहेत. उर्वरित पोलिस अधिकारी वैयक्तिक अडचणींचा हवाला देऊन निवडणूक कामाच्या स्थगितीसाठी मॅटकडे संपर्क साधू शकतात. वैयक्तिक कारणे सार्वजनिक कर्तव्याच्या आड येऊ शकत नाहीत, तसेच मॅटचा आदेश चुकीचा आहे. खंडपीठाने याची दखल घेत पोलिसांना दिलासा देण्यास नकार दिला व निवडणूक कामासाठी मुंबईबाहेर जावेच लागेल, असे स्पष्ट करत पोलिसांची मागणी फेटाळून लावली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.