Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मोबाइलवरील मालिका बंद केल्याने मुलाकडून आईवर हल्ला; घरातील खिडकीच्या काचा फोडल्या

मोबाइलवरील मालिका बंद केल्याने मुलाकडून आईवर हल्ला; घरातील खिडकीच्या काचा फोडल्या



पुणे : खरा पंचनामा

मोबाइलवरील मालिका बंद केल्याने अल्पवयीनाने आईवर कात्रीने वार करण्याचा प्रयत्न केला. मुलाने घरातील खिडकीच्या काचा फोडून आईला मारहाण केल्याची धक्कादायक घटना धनकवडी भागात घडली.

याप्रकरणी अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्याच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला धनकवडी भागात राहायला आहे. सोमवारी रात्री उशीरापर्यंत मुलगा मोबाइलवरील मालिका पाहत होता. त्यावेळी आईने जास्त वेळ मोबाइलवरील मालिका पाहू नको, असे सांगितले. त्यानंतर तो मालिका पाहत होता. त्यामुळे आईने त्याच्या हातातून मोबाइल संच हिसकावून घेतला आणि मालिका बंद केली. आईने मोबाइल संच हिसकावून घेतल्याने मुलगा चिडला. त्याने थेट आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. घरातील लाकडी फ्रेम फोडली, तसेच कात्रीने आईवर वार करण्याचा प्रयत्न केला. आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन घरातील खिडकीच्या काचा फोडल्या. घाबरलेल्या आईने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.