"सेल्समॅनला साडी नेसवण्याचा आग्रह करू नये"
साडीच्या दुकानाबाहेर लावली भन्नाट पाटी
पुणे : खरा पंचनामा
पुणे हे महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय शहर आहे. दरवर्षी हजारो तरुण पुण्यात नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी स्थलांतरित होतात. विद्येचे माहेर घर असलेले पुणे ऐतिहासिक शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते. पुण्यातील प्राचीन मंदिरांपासून ऐतिहासिक वास्तुंपर्यंत, बाजारपेठांपासून खाद्यसंस्कृतीपर्यंत, अनेक गोष्टी सतत चर्चेत येतात. पुण्यातील पुणेरी पाट्यांची चर्चा तर परदेशात सुद्धा होते. तुम्ही पुण्यात अनेक पाट्या पाहिल्या असेल.
असं म्हणतात, कमीत कमी शब्दांच समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची पुणेकरांची कला तुम्हाला या पुणेरी पाटीवर लिहिलेच्या संदेशावरून दिसून येते. व्यक्त न होता आपलं मत ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांचे माध्यम म्हणजे पुणेरी पाटी.
सोशल मीडियावर पुणेरी पाट्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक पुणेरी पाटीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दाखवलेल्या पाटीवर एका साडी विक्रेत्याने भन्नाट मेसेज लिहिला आहे. साडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा मेसेज लिहिला आहे. ही व्हायरल पाटी एका साडीच्या दुकानाबाहेरची आहे. या पाटीवर लिहिलेय, 'कृपा सेल्समनला साडी नेसवण्याचा आग्रह करू नये. क्षमस्व'
सध्या दिवाळीच्या खरेदीसाठी लोक बाजारपेठांमध्ये गर्दी करताहेत. विशेषतः महिलावर्ग साडी खरेदी करताना दिसत आहे. अनेक साडीच्या दुकानात सेल्समन असतात. महिला अंगावर साडी कशी दिसते यासाठी त्यांना साडी नेसवण्याचा आग्रह करतात. अशा महिलांसाठी ही पाटी लावली आहे. ही पाटी वाचून तुम्हीही पोट धरून हसाल.
pune_is_loveee या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, 'स्थळ : रविवार पेठ, पुणे.' या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.