Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत घरफोड्या करुन पुण्यात लपून बसलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

सांगलीत घरफोड्या करुन पुण्यात लपून बसलेला सराईत गुन्हेगार जेरबंद


पुणे : खरा पंचनामा

सांगलीमधील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या करुन पुण्यात लपून बसलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने पकडले.

बबलुसिंग पंजाबसिंग टाक (वय ४२, रा. महात्मा फुले वसाहत) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. बबलुसिंग टाक याने साथीदारांच्या मदतीने सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, विटा पोलीस ठाणे, संजयनगर पोलीस ठाणे यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ५ घरफोडीचे गुन्हे केले असून त्यामध्ये तो वॉन्टेड होता. बबलुसिंग टाक सांगली पोलिसांना चकवा देऊन वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव करीत होता.

गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पथक रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करीत असताना बबलुसिंग टाक हा सातववाडी येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. बबलुसिंग टाक याला सांगली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.