मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाहेर तरुणाने केला पेटवून घेण्याचा प्रयत्न
मुंबई : खरा पंचनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवसास्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाहेर एका तरुणाने जीव देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षाबाहेर काही आरोग्य विभागाचे विद्यार्थी आंदोलन करत होते. मुख्यमंत्र्यांची भेट व्हावी अशी या आंदोलकांची मागणी होती.
मात्र, मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नसल्यामुळे यातील एका संतापलेल्या तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून घेत जीव देण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी 30 ते 40 तरुणांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसांत राज्यात विधानसभा निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे समाजातील विविध घटक आपल्या मागण्यांसाठी आक्रमक होत आहे. सध्या राज्यात गेल्या एका वर्षांपासून मनोज जरांगे यांचे ओबीसीतून मराठा समाजासाठी आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन होत आहे. तर ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध करत मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वाखाली ओबीसी नेते आंदोलन करत आहे.
या आरक्षणाबाबतच्या विविध समाजांच्या रोषातून सावरत नाही तोपर्यंत विविध सरकारी कर्मचारी, विविध विभागातील कर्मचारी, विद्यार्थी आणि बेरोजगार तरुण राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.