Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आधी हप्ता घेतला, नंतर बेडशीटही पळवल्या दोन पोलिसांचं तडकाफडकी निलंबन

आधी हप्ता घेतला, नंतर बेडशीटही पळवल्या
दोन पोलिसांचं तडकाफडकी निलंबन



पुणे : खरा पंचनामा

पुण्यामध्ये दोन पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. रस्त्यावर बेडशिट विक्री करणाऱ्या विक्रेत्याकडून या पोलिसांनी १४ हजार रुपयांचा हप्ता घेतला. हफ्ता घेतल्यानंतरही या पोलिसांनी विक्रेत्याकडून २३ बेडशिट फुकटात घेतल्या. पोलिस उपायुक्त झोन ४ यांनी या दोन्ही पोलिस शिपायांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

पोलिस अंमलदार सुनिल भगवान कुसाळकर आणि संजय महादेव आसवले अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावं आहेत. दोघेही विमानतळ पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. हा प्रकार १७ सप्टेंबर रोजी विमाननगर परिसरात घडला होता. वंचित बहुजन सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल निकाळजे यांनी तक्रार दिल्यानंतर कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.

विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात काहीजण बेडशिट विक्रीसाठी थांबले होते. १७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता पोलिस शिपाई सुनिल कुसाळकर आणि संजय आसवले त्याठिकाणी आले. तुम्ही का थांबलात इथे? थांबायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल असे सांगून त्यांच्याकडील ६० बेडशिट स्कार्पिओ गाडीमध्ये टाकून निघून गेले. त्यानंतर विक्रेत्यांकडून त्यांनी १४ हजार रुपये हप्ता म्हणून घेतले.

त्यानंतर बेडशीट विक्रेते अल्थमेश आणि त्यांच्या मित्रांनी बेडशिटची मागणी केल्यानंतर पोलिसांनी ६० बेडशिटपैकी ३७ बेडशिट परत दिले. २३ बेडशिट स्वतःकडे ठेवून घेतले होते. याबाबत वंचित बहुजन सामाजिक संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल निकाळजे यांनी विमानतळ पोलिस ठाण्यामध्ये १८ सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज दिला होता. त्यावरून पोलिस उपायुक्त यांनी कारवाई करत दोन्ही पोलिसांचे निलंबन केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.