Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महायुतीत वादाची ठिणगी! मुश्रीफ-घाटगेंमुळे लोकसभेत दगाफटका, मंडलिकांच्या मुलाने शड्डू ठोकला....

महायुतीत वादाची ठिणगी! 
मुश्रीफ-घाटगेंमुळे लोकसभेत दगाफटका, मंडलिकांच्या मुलाने शड्डू ठोकला....



कोल्हापूर : खरा पंचनामा

विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप जाहीर होण्याआधीच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवाराला मदत केली नसल्याचा आरोप मंडलिक गटाने करत खळबळ उडवली आहे.

हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यामुळे मंडलिक पराभूत झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता वडिलांच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी माजी खासदार संजय मंडलिक यांच्या मुलाने थेट मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली असून कागल मध्ये त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय मंडलिक याना परभावाचा सामना करावा लागला. या पराभवाचे खापर मंडलिक गटाने हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यावर फोडले आहे. त्यामुळे शिंदेंच्या सेनेला भाजप आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीने मदत केली नसल्याचा आरोप होत आहे. मंडलिक गटाने मेळावा घेऊन हा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. मुश्रीफ आणि घाटगे यांच्या सारखे मातब्बर नेते असताना कागल मतदार संघातून संजय मंडलिक यांना लीड मिळाले नाही. त्याच्या उलट शाहू महाराज यांना अधिक मताधिक्य मिळाले. त्यामुळे मंडलिक गटाने याचे खापर हसन मुश्रीफ आणि समरजीत घाडगे यांच्यावर फोडले आहे. पालकमंत्री असताना सुद्धा मुश्रीफ यांनी काम केले नसल्याचा आरोप करत संजय मंडलिक यांचा मुलगा वीरेंद्र यांनी थेट मुश्रीपांच्या विरोधात विधानसभेला शड्डू ठोकला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.