मिरजेजवळ गोवा बनावटीची दारू जप्त
एकाला अटक, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मिरजेजवळील सुभाषनगर येथे गोवा बनावटीच्या दारूची अवैधरित्या विक्री करताना एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ४१ हजारांची दारू जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
प्रकाश यशवंत खोत (वय ५२, रा. शिवशंकर वसाहत, सुभाषनगर, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना निरीक्षक शिंदे यांनी पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पथक मिरज परिसरात गस्त घालत असताना सुभाषनगर येथील प्रकाश खोत घराजवळच दारू विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली.
पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी खोत एक पोते घेऊन बसल्याचे दिसून आले. पोत्याची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये गोवा बनावटीची दारू सापडली. त्याच्याकडून साठा केलेल्या दारूच्या बाटल्याही जप्त करण्यात आल्या. त्याला अटक करून मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक नितीन सावंत, अमोल ऐदाळे, इम्रान मुल्ला, बाबासाहेब माने, सोमनाथ पतंगे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.