'या' शब्दामुळे देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढणार?
मुंबई : खरा पंचनामा
व्होट जिहादबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी होणार आहे. राज्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले, व्होट जिहाद या विधानावर कायदेतज्ज्ञांकडून मत घेतले जाईल. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार याची चौकशी करून निर्णय घेतला जाईल.
याबाबत ते पुढे म्हणाले की, गेल्या तीन-चार महिन्यांपासून व्होट जिहादबाबत भाषणबाजी होत असली तरी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) मंगळवारपासून कार्यान्वित झाली.
आचारसंहिता मंगळवारी सायंकाळपासून लागू झाल्यामुळे अशा विधानांची चौकशी करण्याचा अधिकार आम्हाला (राज्य निवडणूक अधिकारी) मंगळवारी सायंकाळपासून मिळाले आहेत.
आता ही बाब राज्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली आहे. अशा विधानांची चौकशी करून कारवाई करण्यात कोणताही भेदभाव केला जाणार नाही. कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात फडणवीस यांनी लोकसभेच्या निवडणुकीत 48 पैकी 14 मतदारसंघात व्होट जिहाद झाला, असा आरोप केला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.