अजित पवारांनी ज्यांची फोनवरून उमेदवारी जाहीर केली तेच आमदार आज करणार शरद पवार गटात प्रवेश
सातारा : खरा पंचनामा
फलटण तालुक्यातील बलाढ्य नेतृत्व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्टी देत उद्या फलटण येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. महायुतीसह अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
काही दिवसांपूर्वी या दीपक चव्हाण यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून जाहीर केले होते मात्र आता ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
फलटण येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक- निंबाळकर, फलटण चे माजी नगरसेवक मा. श्रीमंत अनिकेतराजे नाईक-निंबाळकर फलटण पंचायत समितीचे माजी सभापती मा. श्रीमंत विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर व सातारा जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटामधे पक्ष प्रवेश व जाहीर सभा १४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ०३.३० वाजता अनंत मंगल कार्यालय, कोळकी, फलटण येथे होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.