Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नाराज, बंडखोर आणि इच्छुकांच्या सागर बंगल्यावर रांगा

नाराज, बंडखोर आणि इच्छुकांच्या सागर बंगल्यावर रांगा



मुंबई : खरा पंचनामा

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी वरीष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर निवासस्थानी भेटायला येणाऱ्या नेत्यांची मोठी गर्दी पाहयला मिळत आहे. नाराज, बंडखोर आणि इच्छुक उमेदवारांनी सकाळपासूनच सागर बंगल्यावर रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

खडकवासला मतदारसंघातील विद्यामान आमदार भीमराव तापकीर यांच्या उमेदवारीला अनेकांनी विरोध केला आहे. या मतदारसंघातील इच्छुक माजी नगरसेवक नागपुरे आणि समर्थकांनी घेतली फडणवीसांची भेट

पुणे कंन्टोनमेंटमधून सुनील कांबळेंना वेटिंगवर ठेवल्याने माजी नगरसेवक भरत वैरागे यांच्याकडून उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे.

आर्वीचे आमदार दादाराव केचे यांना देखील वेटिंगवर ठेवल्याने ते वेगळ्या विचारात आहेत. अशातच सुमित वानखेडेंना उमेदवारीची शक्यता, केचे नाराज असल्याने वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत

धनंजय महाडिक आपल्या पुत्रासाठी कृष्णराजसाठी उमेदवारीची मागणी केली आहे. उमेदवार अदलाबदल करण्यासंदर्भात त्यांनी भेट घेतली आहे. कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळं कृष्णराज कोल्हापूर उत्तर म्हणून इच्छुक आहेत.

राज पुरोहित कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत. मात्र फडणवीस यांच्या भेटीनंतर नाराजी दूर, भेट सकारात्मक झाल्याची माहिती.

शिवसेनेचे शिंदे गटाकडून इच्छुक असलेले तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत सागर बंगल्यावर, सोलापूर शहर मध्य मधून भाजपकडून मदत मिळावी यासाठी फडणवीस यांच्या भेटीला

पुण्यातील नाराज माजी खासदार संजय काकडे यांनी देखील आज फडणवीस यांची भेट घेतली. काकडे तुतारी हाती घेणार अशी चर्चा होती. मात्र काकडेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न.

बीड जिल्ह्यातील देवराई आणि आष्टी मतदारसंघात अदलाबदल करण्यात यावी यासाठी माजी विधान परिषद आमदार सुरेश धस आष्टीतून इच्छूक आहेत.

राम सातपुतेंचे पहिल्या यादीत नाव नाही, लोकसभेत पराभव झाल्यानंतर पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी, माळशिरसमधून विद्यमान आमदार सातपुते पुन्हा इच्छुक.

वडगाव शेरी मतदारसंघातून टिंगरेंना पोर्शे अपघातामुळे महायुतीचा विरोध, भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक इच्छुक आहेत.

दौंड मतदारसंघातील माजी आमदार राहुल कुल यांना उमेदवारी जाहीर, मात्र अजित पवार गटाचे रमेश थोरात बंडखोरीच्या तयारीत, महायुतीतील बंडखोरीची शमविण्यासाठी कुल सागर बंगल्यावर.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.