"दादांनी सरड्यांचे डायनोसर केले..."
पुणे : खरा पंचनामा
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या नेत्यांनी आपापले निर्णय घेत पक्षातंराची भूमिका स्पष्ट केली आहे, भोसरी पाठोपाठ चिंचवड विधानसभेतही अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. भाऊसाहेब भोईरांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला रामराम ठोकला आहे. चिंचवडची जागा भाजपला सुटत असल्याने भाऊसाहेब भोईरांचा पक्षाला रामराम ठोकला आहे. तीस वर्षे सातत्यानं माझ्यावर अन्याय झाला, असंही भाऊसाहेब भोईर यांनी म्हटलं आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी सरड्यांचे डायनोसर तयार केले. भ्रष्टाचाराच्या प्रवृत्तीची एक पिढी ही तयार केली. अजित पवारांची साथ सोडताना असा घणाघात ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईरांनी केला आहे. यानिमित्ताने भोसरी पाठोपाठ चिंचवड विधानसभेत ही अजित पवारांना आणखी एक धक्का बसला आहे. चिंचवडची विधानसभा लढण्यास तीव्र इच्छुक असलेल्या भाऊसाहेब भोईरांनी अखेर घड्याळाचे काटे फिरवलेत. 2009 साली माझा कार्यक्रम करण्यासाठी, दिवंगत लक्ष्मण जगताप हे अपक्षचं आमदार झाले. मग आता या सर्वांचा आपण ही तसाच कार्यक्रम करू शकतो. असं म्हणत भोईरांनी बंडखोर करणार असल्याचं समर्थकांसमोर जाहीर केलं.
चिंचवडची जागा भाजपला सुटणार असल्यानं भोईरांनी हा नवा डाव खेळला आहे. यावेळी अजित पवारांनी शहरात सरड्यांचे डायनोसर तयार केले. त्यांनी भ्रष्टाचाराची एक पिढी तयार केली, असा घणाघात ही भोईरांनी केला. मुळात त्यांना हे समजलंच नाही की हे खरंच लायक आहेत का? अजितदादा विकासाच्या दृष्टीने पाहत होते, मात्र इथं शहराची पुरती वाट लागली. साथ सोडताच अशी जहरी टीका भोईरांनी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.