निवडणुकीपूर्वी पोलीस खात्यात मोठी घडामोड
आठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. त्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारीही केली जात आहे.
अशातच राज्यातील पोलीस विभागातून महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. पोलीस खात्यात पोलीस उपायुक्त पदावरील आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात शासन आदेशही जारी करण्यात आला आहे.
अभिषेक त्रिमुखे : मुंबईचे सशस्त्र पोलिस दलातील अप्पर पोलिस आयुक्त अभिषेक त्रिमुखे यांची मुंबईतील उत्तर प्रादेशिक विभागात बदली करण्यात आली आहे. संदीप भाजीभाकरे : नागपूरचे राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलिस उप आयुक्त संदीप भाजीभाकरे यांची पुण्यात पोलिस उप आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. संजय लाटकर : मुबंईतील पोलिस उप आयुक्त बंदर परिमंडळाचे संजय लाटकर यांची मुंबईतच पोलिस अधीक्षक सायबर याठिकाणी बदली करण्यात आली आहे. भरत तांगाडे : वाशिमचे अप्पर पोलिस अधीक्षक भरत तांगाडे यांची ठाण्यात अप्पर पोलिस अधीक्षक, यापदावर बदली करण्यात आली आहे.
शिवाजी पाटील : ठाणे शहराचे पोलिस उप आयुक्त शिवाजी पाटील यांची ठाण्यातीलच पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली केली आहे. प्रशांत कदम : मुंबईतील परिमंडळ-4चे पोलिस उप आयुक्त प्रशांत कदम यांची मुंबईतील, अनुसूचित जाती- जमाती आयोग या पदावर बदली झाली आहे. राजीव जैनः मुंबईचे उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त राजीव जैन यांची बदली मुंबईतील पोलीस उप महानिरीक्षक राज्य राखीव पोलिस बल महाराष्ट्र राज्य याठिकाणी करण्यात आली आहे. हेमराज राजपूतः बृहन्मुंबईचे परिमंडळ- 6 चे पोलिस उप आयुक्त यांची मुंबईतील पोलिस अधीक्षक सायबर महाराष्ट्र राज्य या पदावर बदली करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.