चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या युवकाला अटक
घटनेनंतर २४ तासांत विश्रामबाग पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील इंदिरानगर येथील कन्नड गल्लीत चाकूचा धाक दाखवून मारहाण करत खिशातील रोकड लंपास करणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून लुटलेली रोकड जप्त करण्यात आली. घटना घडल्यानंतर केवळ २४ तासांत विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली.
पृथ्वी रवी लोँढे (वय १८, रा. इंदिरानगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास इंदिरानगर येथील कन्नड गल्ली परिसरात संतोष काळे याला एका तरूणाने अडवून चाकूचा धाक दाखवत त्याला लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्याकडील रोकड जबरदस्तीने काढून घेण्यात आली. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयिताचा शोध गुन्हे प्रकटीकरण शाखा घेत होती.
गुन्हे प्रकटीकरणचे हवालदार बिरोबा नरळे यांना यातील संशयित पृथ्वी लोंढे हा इंदिरानगर येथील त्याच्या घरात आल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक करून त्याच्याकडून चोरलेली १२०० ची रोकड जप्त करण्यात आली.
विश्रामबागचे पोलिस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक प्रवीण कांचन, हवालदार बिरोबा नरळे, अमर मोहिते, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, महमद मुलाणी, संदीप साळुंखे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.