Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस कॉन्स्टेबलनं संपवलं जीवन

पोलीस कॉन्स्टेबलनं संपवलं जीवन



मीरा भाईंदर : खरा पंचनामा

नुकतंच पोलीस खात्यात रुजू झालेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलनं आत्महत्या केल्याची घटना घडलीय. मीरा भाईंदरमध्ये पोलीस कॉन्स्टेबलने रूमवर पंख्याला गळफास घेऊन स्वतःला संपवलं.

त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. त्याने आत्महत्येआधी व्हिडीओ शूट करून ठेवल्याचंही सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वसई विरार पोलीस आयुक्तालयात सागर अथनीकर हा पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. प्रशिक्षण पूर्ण करून तो नुकताच नोकरीवर रुजू झाला होता. त्याची नेमणूक कंट्रोल रूमला करण्यात आली होती. मिरारोडमधल्या अपना घर फेस या संकुलात त्यानं गळफास घेतला.

सागर आणि त्याचे इतर सहकारी एकाच खोलीत राहत होते. सायंकाळी साडे सात वाजता सागर रूममध्ये झोपला होता. तेव्हा रूमवर आलेल्या दुसऱ्या सहकाऱ्याला सागरने गळफास घेतल्याचं दिसलं. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

सागर अधिनकर याने कल काशीगाव येथे त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्या पूर्वी त्याने स्वतःचा व्हिडियो बनवला असून त्यात माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये असा उल्लेख केला असून आता तो विडियो समोर आला आहे. त्याने आत्महत्या का केली याच कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.