Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सीमा भागातील गुन्हेगारी हालचालींवर कडक वॉच ठेवा महाराष्ट्र, कर्नाटकातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सूचना

सीमा भागातील गुन्हेगारी हालचालींवर कडक वॉच ठेवा
महाराष्ट्र, कर्नाटकातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सूचना



कोल्हापूर : खरा पंचनामा

महाराष्ट्र कर्नाटकातील सीमा भागात होणाऱ्या गुन्हेगारी हालचालींवर पोलिस, महसूल, राज्य उत्पादन शुल्क, वनविभाग, आरटीओ आदी विभागांनी कडक वॉच ठेवावा. रेकार्डवरील गुन्हेगारांच्या माहितीचे आदान-प्रदान करावे तसेच या सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तयार रहावे अशी सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिल्या. 

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील दोन्ही राज्यातील पोलिस, महसूल, राज्य उत्पादन शुल्क, वनविभाग, आरटीओ अधिकाऱ्यांच्या आयोजित केलेल्या समन्वय बैठकीत ते बोलत होते. महानिरीक्षक श्री. फुलारी म्हणाले, महाराष्ट्रात आंतरराज्य तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत. कर्नाटकातील बेळगावी ग्रामीण, बिदर, विजयापूर, कलबुर्गी येथील संबंधित अधिकाऱ्यांनी सीमा भागात तपासणी नाके सुरू करावेत. अजामीनपात्र वारंट बजावणीस प्रारंभ करावा. पाहिजे असलेले गुन्हेगार, गुन्हेगारी टोळ्या यांच्या माहितीचे आदान-प्रदान दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांनी करावे. उपविभागीय स्तरावर समन्वय बैठकांचे आयोजन करून गोपनीय माहितीचेही आदान-प्रदान करावे, असेही फुलारी यांनी सांगितले. 

अवैध शस्त्रे, रोख रक्कम, मद्यसाठा, गुटखा, अंमली पदार्थ यांचा साठा आणि वाहतुकीवर लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचनाही महानिरीक्षक फुलारी यांनी दिल्या. अवैध मद्यसाठी, मद्याची तस्करी याबाबत पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तपणे मोहीम राबवावी, असेही ते म्हणाले. 

या बैठकीला सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे, कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूरच्या अधीक्षक स्नेहलता शिलकर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर, कलबुर्गीचे पोलिस उपमहानिरीक्षक अजय कुमार हिलोरे, बेळगावीचे पोलिस अधीक्षक भिमाशंकर गुळदे, विजयापूरचे पोलिस अधीक्षक प्रसन्न देसाई, बिदरचे पोलिस अधीक्षक प्रदीप गुट्टी, कलबुर्गीचे पोलिस अधीक्षक अद्दरू श्रीनिवासलू यांच्यासह अन्य विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.