अन् हिंसक मनोरूग्ण महिलेला उपचारासाठी पाठवले वृद्धाश्रमात!
जागतिक मनोरूग्ण दिनी सांगली शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
सांगली : खरा पंचनामा
गुरुवारी एक महिला शहरातील गणपती मंदिराशेजारील पांजरपोळ परिसरात दिसेल त्या गाड्यांच्या काचा फोडत आहे, अशी माहिती देणारा फोन शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संजय मोरे यांना आला. अन् काही वेळातच पोलिस तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी काही नागरिक महिलेला मारण्याच्या उद्देशाने दगड घेऊन जात असल्याचे दिसून आले. महिलेचा रूद्रावतार पाहून निरीक्षक मोरे यांना ती महिला मनोरूग्ण असल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने शिताफीने तिला बळाचा वापर करत ताब्यात घेऊन तिला उपचारासाठी मिरजेतील मातोश्री वृद्धाश्रमात पाठवले. या घटनेत बऱ्याच गाड्यांचे नुकसान झाले आहे. जागतिक मनोरूग्ण दिनी चिडलेल्या जमावाला शांत करत एका मनोरूग्ण महिलेचा जीव वाचवून तिला उपचारासाठी वृद्धाश्रमात दाखल केल्याने याने शहर पोलिसांचे कौतुक होत आहे.
सध्या नवरात्रीमुळे सांगलीतील गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. कालही भाविक मोठ्या प्रमाणात आले होते. यातील अनेक भाविकांनी तसेच नागरिकांनी त्यांच्या गाड्या मंदिराशेजारी असलेल्या पांजरपोळजवळील रस्त्यावर पार्क केल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास एक महिला या रस्त्यावर अचानक तिने शिविगाळ करत गाड्यांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या घटनेने नागरिकांची पळापळ झाली. त्यानंतर काही चिडलेल्या नागरिकांनी दगड घेऊन महिलेचा पाठलाग सुरू केला. नागरिकांची गर्दी झाल्याने मनोरूग्ण महिलेच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच. निरीक्षक मोरे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सहकाऱ्यांना बळाचा वापर करून ताब्यात घेण्यास सांगितले.
महिलेला ताब्यात घेतल्यानंतर तिला सुखरूपपणे मिरजेतील मातोश्री वृद्धाश्रमात उपचारासाठी दाखल केले. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने महिला पोलिस अर्चना पाटील, दीपाली पाटसुते, संदीप कुंभार, गौतम कांबळे, संतोष गळवे, योगेश सटाले आदींनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात भाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.