सुनेत्रा पवारांच्या पराभवामागे हर्षवर्धन पाटलांचा अदृश्य हात...
इंदापुर : खरा पंचनामा
माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पाच वर्षांनंतर अखेर पक्षाला रामराम ठोकत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता इंदापूरातून पाटील हे तुतारी चिन्हावरील उमेदवार असतील हे निश्चित झाले आहे. त्यामुळे इंदापूरात पुन्हा एकदा पारंपारिक प्रतिस्पर्धी दत्ता मामा भरणे यांच्याशी पाटील यांची लढत होणार आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाते प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान गेल्या वर्षी जुलैमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला होता. तेव्हा अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांमध्ये इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांचाही समावेश होता. महायुतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी सहभागी झाल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना भाजपचे तिकिट मिळणे कठिण होते. कारण महायुतीत जिथे ज्यांचा आमदार ती जागा त्या पक्षाला असा नियम आहे. अशात कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवयची असे ठरवलेल्या पाटलांनी अखेर तुतारी हाती घेतली आहे.
या पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, सुप्रिया ताई आम्हाला अभिमान आहे तुम्ही चारवेळा खासदार झाला. त्यातीन तीनवेळा तुमच्या विजयात आमच प्रत्यक्ष सहभाग होता. पण कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग अदृष्य होता."
आता हर्षवर्धन पाटील यांच्या या खुलाश्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या बारामतीतील पराभव आणि इंदापूरातील सुप्रिया सुळे यांच्या लीडमागे कोण होते ते स्पष्ट झाले आहे.
मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळे यांनी सुनेत्र पवार यांच्यावर विजय मिळवत चौथ्यांदा लोकसभा गाठली होती. सुप्रिया सुळे यांच्या या विजयात इंदापूरकरांचा मोठा वाटा होता. त्यांना इंदापूर विधानसभा मतदारसंघातून 25 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. तर त्या एकूण 1 लाख 58 हजार मतांनी विजयी झाल्या होत्या.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.