Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कवलापूरची धीरज नाईक, आटपाडीतील शाहरूख पवार टोळी हद्दपार पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची कारवाई

कवलापूरची धीरज नाईक, आटपाडीतील शाहरूख पवार टोळी हद्दपार
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

मिरज तालुक्यातील कवलापूर येथील धीरज नाईकसह त्याच्या टोळीतील तीन तसेच आटपाडीतील शाहरूख पवारसह त्याच्या टोळीतील तिघांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.  

कवलापूर येथील हद्दपार केलेल्यांमध्ये टोळीप्रमुख धीरज भारत नाईक (वय २३), संतोष उफर् अशोक नाईक (वय २७), अक्षय उर्फ आकाश सतीश नाईक (वय २७) यांचा समावेश आहे. या टोळीवर २०१९ ते २०२४ या काळात बेकायदा जमाव जमवून खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, विनापरवाना पिस्तूल वापरून दहशत निर्माण करणे, गंभीर दुखापत असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही या टोळीच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. त्यामुळे सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक किरण चौगले यांनी या टोळीवर हद्दपारीचा कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे पाठवला होता. त्याचे अवलोकन करून तसेच त्यावर सुनावणी घेतल्यानंतर अधीक्षक घुगे यांनी या टोळीला सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले. या कारवाईत एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे, ग्रामीणचे निरीक्षक किरण चौगले, अमोल ऐदाळे, दीपक गट्टे, मेघराज रूपनर, बंडू पवार, आदींनी भाग घेतला. 

आटपाडी येथील हद्दपार केलेल्यांमध्ये टोळीप्रमुख शाहरूख विजय पवार (वय ३५), लखन विजय पवार (वय ४५), देवगन उर्फ देव्या बापू पवार (वय २६) यांचा समावेश आहे. या टोळीवर २०१७ ते २०२४ या काळात बेकायदा जमाव जमवणे, घरफोडी, चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही या टोळीच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. त्यामुळे आटपाडी पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक विनय बहिर यांनी या टोळीवर हद्दपारीचा कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे पाठवला होता. त्याचे अवलोकन करून तसेच त्यावर सुनावणी घेतल्यानंतर अधीक्षक घुगे यांनी या टोळीला सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले. या कारवाईत एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे, आटपाडीचे निरीक्षक विनय बहिर, अमोल ऐदाळे, दीपक गट्टे, उमर फकीर, दादासाहेब ठोंबरे, प्रमोद ठोंबरे आदींनी भाग घेतला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.