राहुल गांधीनी कोल्हापूरात टेम्पोचालकाच्या घरात घेतला घरगुती जेवणाचा आस्वाद!
कोल्हापूर : खरा पंचनामा
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. याठिकाणी राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. आज सकाळी राहुल गांधी कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राहुल गांधी कुठल्याही हॉटेल न जाता थेट उचगावातील एका कौलारू घरात पोहचले. तिथं त्यांनी घरगुती जेवणाचा आस्वाद घेत पुढे नियोजित कार्यक्रमस्थळी दाखल झाले.
कोल्हापूरच्या उचगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील अजित तुकाराम संधे यांच्या घरी राहुल गांधी यांनी भेट दिली. याठिकाणी जवळपास अर्धा तास राहुल गांधी यांनी संधे कुटुंबाशी संवाद साधला. संधे कुटुंबानेही राहुल गांधींचा पाहुणाचार करत त्यांना घरीच नाश्ता बनवून खायला दिला. अजित संधे टेम्पोचालक आहेत. त्यांचे सर्वसामान्य गरीब कुटुंब आहे जे उचगावात राहतात. या भेटीबाबत काँग्रेस आमदार विश्वजित कदम म्हणाले की, गांधी कुटुंबाचा डीएनएच गोरगरिब कुटुंबासोबत राहणे, सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणं, त्यांच्या सुखदुखात सहभागी होणे हे आहे. ही गांधी कुटुंबाची परंपरा राहुल गांधी जोपासत आहेत. कोल्हापूर शहरातील अत्यंत गरीब कुटुंबातील लोकांशी संवाद साधत त्यांचे जीवनमान समजून घेण्यासाठी आले होते ही फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे असं त्यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.